Sunday, October 12, 2008

आपली सिस्टम


गुरुवारच्या संध्याकाली आम्ही ऑफिस मधून घरी जात होतो. माझा मित्र drive करत होता. मी बाजूला बसून टाइमपास करत होतो. एका signal वर आमची गाड़ी थांबली. खरा सांगायच म्हणजे सिग्नल रेड नव्हता. नुसताच Yellow झाला होता. आमच्या बाजूची गाड़ी पण Yellow लाइट वर थांबली. सहज बाजूला बघितल तर बाजुच्या गाडी पण एक भारतीय drive करत होता.

मी माझ्या मित्राला म्हणालो " कमालच आहे चक्क दोन्हीही भारतीय traffic rules पालताहेत. एरव्ही yellow लाइट म्हणजे गाडी थाबवांयाचा नाही तर गाडी जोरात चालवायचा सिग्नल...! आपण कधी yellow सिग्नल वर थम्बतो का? आपला सिग्नल red झाला तरी आपण गाड़ी पलव्तो. जो पर्यंत समोरचे लोक आपल्याला horn वाजवून आपल्या गाडी समोर गाड्या आडव्या आनत नाहीत तो पर्यंत आपण गाडी थाम्बवत नाही ...! पण भारताबाहेर आम्ही कधी चुकत नाही...!" यावर माझा मित्र बोलला की - आपली सिस्टम ख़राब आहे. इकडे भ्रस्टाचार नाही वगैरे वगैरे ... नंतर मला एक उदाहरण देत तो बोलला की पुण्यात त्याची बाइक पोलिसांनी पकडली आणि बदल्यात २५०० रुपये मागितले मग याने १०० रुपयात सेटलमेंट केली.

खर सांगायच म्हणजे १०० रुपयात सगल निभावल म्हणुन तो खुश झाला. आणि उगाच कोण फाईन भरायला ओफिसत जाईल ... वेल वाया घालवेल ... ऑफिसला सुट्टी ... या सगल्या पेक्षा १०० रुपये सोयीचे ...! हे सगळे विचार माझ्या डोक्यात चालू असतांना मी त्याला विचारले की पोलिसनी त्याला १०० रुपये मागितले की यानी स्वतः दिले ....? मग सिस्टीम ला दोष कशाला देतो ? इतक्यात घर आल्यामुले आमचा विषय अर्धवट राहिला.

दुसरया दिवशी मी माझी गाडी घेतली. इकडे आम्ही car pulling (कार शेअरिंग ) करतो . एक तर ते इकोनोमिकल पण आहे आणि सोबत कुणी गप्पा मारायला पण असत ..... आम्ही परत त्याच सिग्नल वर थांबलो. आता फक्त आमच्या जागा बदलल्या होत्या. इतक्यात तो बोलला की कालची तुझी गोस्ट मला पटली. आपण स्वतः सिस्टिम ख़राब करतो आणि मग तिला दोष देतो . त्याच्या बोलण्यात फक्त बोलण्याचा भाव नव्हता.... त्या भल्या माणसान आपली चुक मान्य केली आणि तेवढा बोलून तो काहीतरी विचारात बुडाला।

मी मात्र काहीच बोललो नाही कारण त्या दिवशी Friday होता ..... मी वीकएंड मूड मध्ये होतो ... उगाच गंभीर चर्च्या करून मला माझा वीकएंड ख़राब करायचा नव्हता ....

No comments: